Ind Vs Eng ODI : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांचा कस लागणार

एमपीसी न्यूज – पुण्यातील गहुंजे मैदानावर भारत आणि इंग्लंड दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना 66 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. तर, मालिकेत बरोबरी साधून आव्हान जिवंत राखण्यासाठी इंग्लंड प्रयत्नशील असणार आहे. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे, तसेच फलंदाज सॅम बिलिंग्स दुसऱ्या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोन आज एकदिवसीय पदार्पण करत आहे. आज इंग्लंडने संघात डेव्हिड मलान आणि रीसी टॉप्लेला संधी दिली आहे.

दुसरीकडे भारतीय संघात पहिल्या वनडेत दुखापतग्रस्त झालेल्या श्रेयस अय्यरच्या जागी रिषभ पंतला स्थान देण्यात आले आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि अष्टपैलू कृणाल पंड्या यांनी छाप पाडली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत प्रसिद्धने, तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलच्या अनुपस्थितीत कृणालने आपली भूमिका चोख बजावली.

असे आहेत संघ
भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा.

इंग्लंड संघ –
जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जेसन रॉय, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, रीसी टॉप्ले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.