Pune Crime News : चरस विक्रीसाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

एमपीसीन्यूज : चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून 2  लाख 68  हजारांचे 36  ग्रॅम चरस आणि दुचाकी असा 3 लाख 18  हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहादाब सलीम खान (वय 34, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

खंडणी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आझादनगर चौकातील कमानीजवळ एकजण थांबला असून त्याने चरस अमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 2 लाख 68 हजारांचा 36  ग्रॅम चरस मिळून आले. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.