Pune Crime News : गुंडांचा घरात घुसून कुटुंबावर हल्ला; चिमुकलीच्या गालावर वार

एमपीसीन्यूज : पत्त्याचे डाव खेळताना लहान मुलीचा अडथळा येत असल्याने एका सराईत गुन्हेगाराने तिच्या कुटुंबावर हल्ला केला. या हल्लयात सुऱ्याचा वार लागल्याने एका सात वर्षाच्या मुलीचा गाल फाटला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

करण सुंदरलाल वाल्मीकी, पापा वाघेला, साहिल उर्फ लड्डू वाघेला(रा.रामटेकडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर रफीक शेख याच्याविरुध्दही गुन्हा दाखल झाला आहे. करण वाल्मीमी याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली होती. याप्रकरणी मगरीनभाईच्या चाळीत रहाणाऱ्या एका महिलेने फिर्याद दिली आहे.

यातील आरोपी हे सार्वजनीक शौचालयापाशी पत्त्त्यांचा डाव खेळत होते. यामुळे महिलांना शौचालयात जाता येत नव्हते. दरम्यान फिर्यादीची सात वर्षीय भाची तेथे खेळायला गेल्याने आरोपींना पत्ते खेळताना अडथळा निर्माण झाला होता.

याचा राग मनात धरुन आरोपी फिर्यादी महिलेच्या घरात घुसले. तेथे करणने फिर्यादीच्या पतीच्या गळ्यावर वार करण्याच्या उद्देशाने सुरा उगारला होता. तो फिर्यादीच्या पतीने चुकवला, मात्र त्यांच्या भाचीच्या गालावर त्याचा वार बसला. यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मुलगा व मुलगी यांनाही खाली पाडून मारहाण केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटवडे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.