Pune Crime News: सोसायटीच्या मेंटेनन्सची विचारणा केल्याने माजी नगरसेविकेच्या मुलाकडून दांपत्याला मारहाण

एमपीसी न्यूज : पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या मुलाने एका ज्येष्ठ दांपत्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार (Pune Crime News) उघडकीस आला आहे. सोसायटीच्या मेंटेनन्स वरून विचारणा केल्याने हा सर्व प्रकार घडला आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर दुधाने यांच्यावर भादवी कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंकज जाधव (वय ३३) यांनी तक्रार दिली आहे.

वारजे माळवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज हे कर्वेनगर परिसरातील माऊली रेसीडेन्सी इमारतीत राहतात. हा फ्लॅट त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे. आरोपी समीर दुधाने यांनी ही इमारत बांधली आहे. इमारतीच्या मेंटेनन्सचे काम देखील तेच पाहतात. दरम्यान दोन दिवसांपूर्वी समीर यांनी सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर इमारतीचे कॉमन बिल टाकले होते. बिल जरा जास्त वाटल्याने फिर्यादी हे त्यांचे वडील आणि इतर दोन रहिवाशासह विचारणा करण्यासाठी समीर दुधाने यांच्याकडे गेले होते.

महर्षी कर्वे युगप्रवर्तक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

दरम्यान बिलासंबंधी विचारणा केल्यानंतर समीर दुधाने यांना राग आला आणि त्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना हाताने मारहाण करत स्वीकार केली. वडिलांना होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी फिर्यादी केले असता त्यांना देखील लाथाबुक्यानी मारहाण करण्यात आली. फिर्यादीच्या तोंडावर बूटाने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.