Pune crime News : विदेशात एचआर ॲडमिनपदी नोकरीच्या आमिषाने महिलेची पाच लाखांची फसवणूक

विविध कारणांसाठी महिलेकडून पाच लाख 11 हजार 5 रुपये घेऊन नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली.

एमपीसी न्यूज – विदेशातील बांधकाम क्षेत्रात काम करणा-या एका कंपनीत एच आर ॲडमिन पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विविध कारणांसाठी महिलेकडून पाच लाख 11 हजार 5 रुपये घेऊन नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार 16 नोव्हेंबर 2019 ते 5 डिसेंबर 2019 या कालावधीत घडला.

याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात बँक खातेधारक, मोबईलधारक आणि ई मेलधारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेशी मोबईल फोनवर, ई मेलवर संपर्क केला. त्याद्वारे आरोपींनी BOUYGUES CONSTRUCTION या बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपनीत एच आर ॲडमिन पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.

फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून नोकरीसाठी व्हिसा ॲप्लिकेशन फी, व्हिसा स्टॅंपिंग फी, वर्क परमिट फी, काउंसलर फी, हेल्थ इन्श्युरन्स फी, ट्रॅव्हल अलाउंस IELTS फी, वर्क परमिट सिक्यूरीटी बॉंड फी, अकाउंट ओपनिंग डिपॉझिट फी अशा वेगवेगळ्या कामांसाठी बँक खात्यावर पाच लाख 11 हजार 5 रुपये भरण्यास भाग पाडले.

त्यानंतर त्यांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत अनोळखी व्यक्तींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 419, 420, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66 (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.