Pune Crime News : फरार आरोपीस पोलिसांनी नगर जिल्ह्यात केली अटक

एमपीसी न्यूज – महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या आरोपीस चंदननगर पोलिसांनी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे अटक केली.

अब्दुल वहिद शेख (रा. माळीवाडी,पाचपीरचावडी, नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख याला अटक करण्यासाठी चंदननगर पोलिस ठाण्यातील अधिकारी दिलीप पालवे,पोलीस अंमलदार नामदेव गडदरे,सुभाष आव्हाड यांचे पथक आठ मे रोजी नगरला गेले होते.मात्र शेख संबंधित पत्त्यावर रहात नसल्याचे समजले. त्यामुऴे आरोपीबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती.

दरम्यान, त्याच वेळी तांत्रिक पध्दतीने तपास सुरू करून शेख याला 9 मे रोजी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथून अटक करण्यात आली.या प्रकरणाचा तपास चंदननगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनिल जाधव,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे,पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांच्या पथकाने केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.