Pune Crime News : गुंड पप्पू वाडेकरचा खून वर्चस्ववादातून, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – राजगुरुनगर येथील पाबळ परिसरात कुख्यात गुंड पप्पू उर्फ राहुल कल्याण वाडेकर (वय 28) याचा काल निर्घृण खून करण्यात आला होता. पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. वर्चस्ववादातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना अटक केली आहे.

जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे (वय 31, रा. तिन्हेवाडी रोड, जयगणेश दर्पण सोसायटी, राजगुरुनगर, ता. खेड) आणि बंटी ऊर्फ विजय जगदाळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. खेड पोलिस ठाण्यात या प्रकरणी मयत पप्पू वाडेकर त्याचा भाऊ अतुल कल्याण वाडेकर यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल उर्फ पप्पू वाडेकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी यासह 9 गुन्हे दाखल आहेत. 2011 मध्ये त्याने राजगुरुनगरचे माजी उपसरपंच सचिन ऊर्फ पपा भंडलकर यांचा खून केला होता. पप्पू वाडेकर याच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे ग्रामीण पोलिसांनी त्याला तडीपार केले होते.

काही दिवसांपूर्वीच पप्पू वाडेकर आणि राजगुरूनगर शहरातील मिलिंद जगदाळे व टोळीशी वाद झाले होते.

याच वादातून सोमवारी पहाटेच्या सुमारास वरील आरोपींनी पप्पू वाडेकर याला पाबळ परिसरात गाठले आणि गोळीबार करत त्याच्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस याचा तपास करत असताना त्यांना वरील आरोप विषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी राजगुरुनगर शहरातून त्याला पकडले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या देखील आरोपीला पकडण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.