Pune Crime News : फेसबुकवरच्या ओळखीतुन मिळवले महिलेचे न्यूड फोटो; व्हायरल करण्याची धमकी देत एक कोटी खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर फसवणुक करण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही असाच एक प्रकार उघडकीस आलाय. फेसबुकवर ओळख झाल्यानंतर एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो मिळवत तब्बल एक कोटीची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी सौरभ सुभाषचंद्र सुखिजा (वय 31) त्याच्याविरोधात बलात्कार आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 34 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 2019 पासून हा प्रकार सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी ची ओळख फेसबुकवर झाली होती. त्यानंतर आरोपीने तिचा विश्वास संपादन करून प्रेमाचे नाटक करत तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ मिळवले होते. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले होते. तसेच हे व्हिडिओ त्याने स्वतःच्या स्टेटसला देखील ठेवले होते.

दरम्यान हे फोटो आणि व्हिडिओ परत देण्यासाठी त्याने फिर्यादी महिलेकडे तब्बल एक कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर पीडित महिलेने सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अर्ज दिला होता. पोलिसांनी अर्जाची चौकशी करून पुढील तपासासाठी हा अर्ज वानवडी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.