Pune Crime News : सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने चार लाखांचा गंडा
एमपीसीन्यूज : सीमकार्ड अपडेट करण्याच्या बतावणी करून एका सायबर चोरट्याने एका नागरिकाला 3 लाख 86 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी 54 वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार आंबेगाव परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्याने त्यांना मोबाइीलवर संपर्क साधला होता. मोबाइल कंपनीतून बोलत असून सीमकार्ड अद्यायावत न केल्यास मोबाइल क्रमांक बंद पडेल, अशी बतावणी त्याने केली.
त्यानंतर सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली. लिंक उघडल्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्याने खात्यातून 3 लाख 86 हजार 726 रुपये लांबविले.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे तपास करत आहेत.