Pune Crime News: पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार; वाळू व्यवसायिक जखमी

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वीच पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भरदिवसा गोळ्या घालून बिल्डरची हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एका व्यवसायिक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे.

मयुर हांडे (वय 32) असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार जखमी मयुर हांडे हे वाळू व्यावसायिक आहेत. बांधकामासाठी लागणारी वाळू पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. आज दुपारच्या सुमारास ते वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौकातून जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये जखमी झाल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिस आणि गुन्हे शाखेचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एका बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर काही दिवसात ही दुसरी घटना घडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.