Pune Crime News : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने सहा जणांची 1 कोटी 31 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे सांगून कोट्यावधी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राहुल यादव आणि समीर सिंग अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी सहा जणांकडून 1 कोटी 31 लाख 37 हजार 406 रुपये घेतले. त्यानंतर एमबीबीएसला प्रवेश न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सुहाष नारायण ओव्हाळ (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी वरील आरोपींशी संपर्क साधला. आरोपीने तिच्याकडून आणि इतर पाच लोकांकडून वेळोवेळी 1 कोटी 31 लाख 37 हजार रुपये घेतले. त्यानंतर प्रवेश मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.