Pune Crime News : ‘गे डेटिंग’ ॲपवरील ओळखीतून तरुणाचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केले; तिघांना अटक

एमपीसीन्यूज : काही दिवसांपूर्वी पुण्यात गे डेटिंग ॲपवर ओळख झालेले तरुण शरीरसंबंधासाठी एकत्र भेटले. परंतु नंतर त्यातील एकाचे नग्नावस्थेतील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला होता. तसाच काहीसा प्रकार कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतही उघडकीस आला आहे. गे डेटिंग ॲपवर भेटलेल्या एका तरुणाला भेटण्यासाठी बोलावून त्याचे लग्न फोटो काढण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित तरुणाने त्याला विरोध केला असता तिघांनी त्याला धमकावत फोन पे द्वारे त्याच्याकडून दहा हजार रुपये काढून घेतले.

या प्रकरणी एका 35 वर्षीय पीडित तरुणाने फिर्याद दिली. त्यानुसार तीन आरोपींविरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करुन तिघांनाही अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. गे डेटिंग ॲपवर त्याने अकाउंट उघडले होते. या ॲपवर आरोपींची आणि त्यांची ओळख झाली होती.

त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले आणि दोघांनी एकत्र भेटण्याचे ठरले होते. फिर्यादी तरुण त्यांना भेटण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याचे न्यूड फोटो काढले आणि त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता त्याने आणखी दोघांना बोलावले आणि फिर्यादीला धमकावून त्याच्या फोन पे मधून दहा हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तिथून बाहेर पडल्यानंतर आरोपीने पोलीस स्टेशन गाठत यासंबंधीची तक्रार दिली.

अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.