Pune Crime News : पुणे विद्यार्थी गृहाच्या पदाधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- पुणे विद्यार्थी गृह संचालक मंडाळाच्या कार्याध्यक्षांना पगार व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद घालत एका महिला सेवकाच्या (Pune Crime News) सांगण्यावरून बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात श्रीकांत शिळीमकर, रेणुका गोडबोले यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील रेडेकर (वय 57 ) यांनी तक्रार दिली आहे.

Pune Crime News : तुझी मांजर माझ्या घरात आलीच कशी म्हणत दोन शेजारणीत फ्री स्टाइल हाणामारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील रेडेकर पुणे विद्यार्थी गृह येथील संचालक मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. तर रेणुका गोडबोले संस्थेत अभियांत्रिक महाविद्यालयात सेविका आहेत. त्या स्वत:च्या पगारावरून आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद घालत असतात.

दरम्यान, त्यांच्या सांगण्यावरून श्रीकांत शिळीमकर व इतर हे संस्थेत रात्री शिरले. त्यांनी कार्याध्यक्ष यांना त्यांच्या पत्नी व कुटूंबासमोर शिवीगाळ केली. त्यांना अपमानित करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत (Pune Crime News) म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.