Pune Crime News : दुचाकी आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

सहकारनगर पोलिसांची कामगिरी

एमपीसीन्यूज : शहरातील विविध भागातून दुचाकी आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून प्रत्येकी चार दुचाकी आणि मोबाईल असा मिळून 1 लाख 3 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

महेश अनिल साळुंके (वय 24, रा. धनकवडी ) आणि शुभम सिताराम शिंदे (वय 19, रा. धनकवडी, मूळ- खरीव, वेल्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी धनकवडी स्मशानभूमी परिसरात दोघेजण संशयास्पद उभे असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले असता, ते दुचाकी सोडून पळून जाऊ लागले.

त्यामुळे संशय आल्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी धनकवडी परिसरातून दुचाकी आणि महागडे मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 3 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.