Pune Crime News : पुण्यात दोन हुक्का पार्लरवर छापा

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा एक यांनी दोन हुक्का पार्लरवर छापे मारले असून यामध्ये आठ जणा विरोधात गुन्हे  दाखल (Pune crime News) कऱण्यात आले आहेत.

 

यामध्ये पोलिसांनी पुण्यातील राजा बहादूर मिल स्टेशन रोड येथील हॉटेल ड्रामा -9  या ठिकाणी छापा मारून हॉटेल मॅनेजर व वेटर यांच्यावर गुन्हा दाखल करत तेथून 18 हजार 500 रुपयांचा हुक्का पॉट, तंबाखू जन्य फ्लेवर हुक्का असा ऐवज जप्त करण्यात आला.

 Pune Crime News : पुण्यात शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना शस्त्रासह अटक

दुसऱ्या कारवाईमध्ये पोलिसांनी कोरेगाव पार्क येथील हॉटेल मोका या ठिकाणी छापा मारला ज्यामध्ये काचेचा हुक्का हॉट, तंबाखू जन्य हुक्का असा एकूण 34 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला व संबंधितांवर गुन्हे दाखल केले. या दोन्ही कारवाई मध्ये पोलिसांनी सहा जणा विरोधात गुन्हे दाखल केले (Pune crime News) असून एकूण 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  यामध्ये हॉटेल मालकासह आठ जणा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाडसहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळेशैलजा जानकर व त्यांच्या तपासी पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.