Pune Crime News : पुण्यात शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज – पुण्यामध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखा एक ने शस्त्रासह अटक केली (Pune Crime News) आहे. ही कारवाई शनिवारी (दि.21) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

 शुभम शांताराम शिसवाल (वय 19 रा. मध्यप्रदेश) व  सनी संजय जेधे (वय 24 रा.लोणावळा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

 MPC News Podcast 24 January 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा एक च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला दोन इसम हे पुणे नगर रोडवर बसस्टॉप वर पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी (Pune Crime News)सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 20 हजार रुपयांचा गावठी बनावटीचा कट्टा व मोबाईल असा 85 हजार रुपायांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

 

आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात बेकायादा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व त्यांच्या तपासी पथकाने(Pune Crime News) केली. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.