रविवार, जानेवारी 29, 2023

Neo Metro : भोसरी ते चाकण दरम्यानचा डीपीआर  पालिकेस सादर; 1 हजार 548 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – भोसरी ते चाकण या 16.11 किलोमीटर अंतराच्या निओ मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीडार) महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने (महामेट्रो) पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नुकताच (Neo Metro)सादर केला आहे. या मार्गावर एकूण 11 स्टेशन आहेत. या प्रकल्पाचा खर्च 1 हजार 548 कोटी 14 लाख आहे. पालिकेने मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह तळेगाव व चाकण येथील औद्योगिक पट्टा (एमआयडीसी) थेट पुणे शहराशी मेट्रोच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने महामेट्रोस कासारवाडीतील नाशिक फाटा ते चाकण असा मेट्रो मार्गिकेचा डीपीआर बनविण्यास सांगितले होते. त्यानुसार महामेट्रोने डीपीआर तयार करून तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केला होता. मात्र, या मार्गावर दाट लोकवस्ती नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद अधिक असणार नाही, असे सर्वेक्षणात पुढे आले. त्यामुळे मेट्रोऐवजी कमी खर्चाची निओ मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव महामेट्रोने मांडला होता. त्या पर्यायास पालिका प्रशासनाने सहमती दिली.

Pune Crime News : पुण्यात दोन हुक्का पार्लरवर छापा

तसेच, महापालिकेच्या वतीने 31.40 किलोमीटर अंतराचा एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रॉन्झीस्ट रूट-रिंग रोड) प्रस्तावित आहे. त्या प्रकल्पासाठीही निओ मेट्रोचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. त्याचा ही डीपीआर महामेट्रोने तयार करून तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केला.  एचसीएमटीआर मार्गात नाशिक फाटा ते भोसरी हा 8 किलोमीटर अंतराचा मार्ग असल्याने तो चाकणपर्यंतच्या मार्गातून वगळण्यात आला आहे.

उर्वरित भोसरी ते चाकण या 16.11 किलोमीटर अंतराचा सुधारित डीपीआर तयार करण्यास पालिकेने सांगितले. त्यानुसार महामेट्रोने डीपीआर तयार करून पालिकेस नुकताच सादर केला आहे. त्यासाठी 1 हजार 548 कोटी 14 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने या डीपीआरला मंजुरी दिल्यास तो राज्य व केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

हे आहेत 11 स्टेशन 

भोसरी ते चाकण या 16. 11 किलोमीटर अंतराच्या निओ मेट्रो मार्गिकेवर एकूण 11 स्टेशन आहेत. त्यात भोसरी डिस्ट्रीक्ट सेंट्रल (पूर्व), पीआयईसी सेंटर, बनकरवाडी, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बार्गे वस्ती, कुरूळी, आळंदी फाटा, मुक्तेवाडी, तळेगाव चौक, चाकण चौक हे स्टेशन आहेत.

Pune Crime News : पुण्यात शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना शस्त्रासह अटक

हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड निओ मेट्रो

हायस्पीड टारबेस्ड एलिव्हेटेड निओ मेट्रो या मार्गावर धावणार आहे.  रब्बरचे टायर असलेली बस आहे. ही बस इलेक्ट्रीकवर धावते. बस वातानुकूलीत असणार आहे. निओ मेट्रोचे कोचेस, सोयीसुविधा, स्टेशन व इतर सगळे मेट्रोप्रमाणे आहे. निओ मेट्रो रूळांऐवजी रबरी टायरवर धावते. त्याच्या एका कोचमध्ये सुमारे 180 ते 250 प्रवासी प्रवास करू शकतात. ती एकावेळी तीन कोचेससह धावते. निओ मेट्रोची रचना बससारखी आहे.

पालिकेस डीपीआर सादर

भोसरी ते चाकण या निओ मेट्रो मार्गिकेचा सुधारित डीपीआर बनवून पिंपरी-चिंचवड महापालिकेस डिसेंबर 2022 मध्ये सादर करण्यात आला आहे. हा मार्ग एलिव्हेटेड (उन्नत) असणार आहे. त्यामुळे भोसरी, तळेगाव व चाकण हा औद्योगिक पट्टा मेट्रोने जोडला जाणार आहे, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

Latest news
Related news