Pune Crime News : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

एमपीसीन्यूज : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात दोन दिवसांपूर्वी नऱ्हे परिसरात घडला.

अक्षय वसंत रेटवडे (वय २५, रा. रेटवडे, ता. खेड) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी शिवकल्याण वसंत रेटवडे (वय २३) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास अक्षय दुचाकीवरुन नऱ्हेतील स्वामी नारायण मंदीरासमोरील रस्त्यावरुन जात होता.

त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या वाहनचालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे अक्षयचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. जे. वाघमारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.