Pune Crime News : ‘दोनशे’च्या हुक्क्यासाठी ‘तीनशे’ रुपये मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण

एमपीसीन्यूज : दोनशे रुपयांच्या हुक्का फ्लेवरसाठी तीनशे रुपयांची मागणी करणाऱ्या हॉटेल मालकासह तिघांना जबर मारहाण करण्यात आली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी रात्री 10 वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी सफवान आशरफ मोहम्मद (वय 26) यांनी फिर्याद दिली असून आरोपी सोनू चौधरी आणि अन्य दोघांवर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आय ट्वेंटी कारमधून रात्रीच्या सुमारास फिर्यादीच्या हॉटेलवर आले. त्यांनी हॉटेलमध्ये येऊन हुक्का फ्लेवरची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीनी पैसे मागितले असता आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला.

‘दुसरीकडे 200 रुपये असताना तुम्ही हुक्का फ्लेवरचे तीनशे का घेता’, असे म्हणत वाद घातला आणि फिर्यादीसह आणखी दोघांना मारहाण केली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.