Pune Crime News : पुण्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील लोणी काळभोर, वानवडी आणि वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोलापूर हायवे रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. लता पांडुरंग दुधाळ (वय – 48) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

दुधाळ या पतीसह दुचाकीवरुन जात असताना हा अपघात घडला. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी एका चार चाकी वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई बंगळुरू महामार्गावर चांदणी चौकाजवळ झालेल्या अपघातात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. शितलराज विश्वास पाटील (वय 36) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शितल राज हे पायी जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. या प्रकरणी दुचाकीचालक तरुण अक्षय अशोक धुमाळ (वय 21) याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेपडळ रेल्वे गेट जवळ झालेल्या अपघातात चंदुलाल चेतन दिसले (वय – 56 ) या व्यक्तीचा मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या एका कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी डबल सीट जाणाऱ्या चंदूलाल दिसले यांचा मृत्यू झाला. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.