Pune Crime : पुरेसा नाश्ता दिला नाही, 65 वर्षीय पतीने 63 वर्षीय पत्नीला दिले ढकलून

एमपीसी न्यूज : पुण्यातील चतु:शृंगी परिसरात (Pune Crime) पुरेसा नाश्ता न दिल्याने रागावलेल्या ज्येष्ठ पतीने ६३ वर्षीय पत्नीला ढकलून दिले. त्यात ज्येष्ठ पत्नीच्या खुब्यास मार लागून त्यांचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.

याप्रकरणी ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ६५ वर्षीय पतीवर गुन्हा दाखल केला आहे. हे ज्येष्ठ दाम्पत्य भोसलेनगर येथे राहण्यास आहेत. त्यांच्याबरोबर मुलगा आणि सूनही राहतात. तक्रारदारांचे वय झाल्याने त्यांना फारसे काम होत नाही. तरीही त्यांनी पतीसाठी नाष्टा बनविला होता. त्यांना तो दिला. पण, नाश्ता पुरेसा न दिल्याने पतीला राग आला अन ते तक्रारदार पत्नीवर चिडले देखील. इतकेच नाही, त्यांनी शिवीगाळ करत त्यांना ढकलून दिले. त्या फरशीवर पडल्याने त्यांच्या डाव्या पायाच्या खुब्यास दुखापत झाली. मुलगा आणि सुनेने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Chikhali Crime News : सेल्समन तरुणाने जुन्या साड्या घेऊन वस्तू देण्याच्या बहाण्याने घरात येऊन 61 हजारांचा ऐवज पळवला

महिलेच्या खुब्यावर शस्त्रक्रिया (Pune Crime) करण्यात आली. मुलगा आणि सुनेशी चर्चा केल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.