Uruli Devachi :दारुच्या नशेत पत्नीला जिवंत जाळले, सुदैवाने..

एमपीसी न्यूज : मुलासोबत झालेले भांडण सोडवल्याचा रागातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवून दिले. सुदैवाने या घटनेत पत्नीचे प्राण वाचले. पत्नीच्या तोंडाला डाव्या हाताला व छातीला या घटनेत गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार उरुळी देवाची (Uruli Devachi) गावात घडला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी पती सोमनाथ लक्ष्मण वाघमोडे (वय 40) याला अटक केली आहे. 40 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आणि आरोपी सोमनाथ यांच्यात गाडीची चावी देण्यावरून भांडण झाले होते. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या होत्या. यावेळी मद्यप्राशन करून असलेल्या सोमनाथला राग आला. रागाच्या भरात त्याने फिर्यादीचे अंगावर पेट्रोल टाकून आता तुला मारून टाकतो असे बोलून माचीसच्या काडीने पेटवून दिले. या घटनेत फिर्यादी भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक हंबीर अधिक (Uruli Devachi) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.