Pune Crime : लुटमारीत विरोध केल्याने तरुणाची हत्या; अल्पवयीन मुलासह एका तरुणालाही अटक

एमपीसी न्यूज : पुण्यात रोजच चोरीच्या आणि लुटमारीच्या घटना होत (Pune Crime ) असतात. परंतु, आता यामध्ये तरुण तसेच अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला असून लुटमारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. कात्रज परिसरात फूटपाथवर 25 फेब्रुवारी रोजी 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. लुटमारीला विरोध केल्याने या तरुणाचा 19 वर्षीय तरुणाने आणि 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने खून केल्याचा खुलासा पोलिसानी केला आहे. या दोघांनाही पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी कात्रज चौक ते कात्रज घाट या रस्त्याच्या फूटपाथवर काही रहिवाशांना एक मृतदेह आढळून आला. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटली नव्हती. शवविच्छेदन तपासणीच्या प्राथमिक अहवालात बोथट वस्तूवरून डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या पथकाने परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विविध क्लूवर काम केले. त्यातून पोलिसांना मृतकाची ओळख पटली. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव महादेव चेंडके असून त्याच्या मित्राने दारूच्या दुकानात ऑनलाइन पेमेंट केल्याचे समोर आले.

त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्यावर समजले, की चेंडके हा मजूर होता. तो उदरनिर्वाहासाठी किरकोळ विद्युत दुरुस्तीचे काम करत होता.

महादेव हा 25 फेब्रुवारीच्या रात्री दारूच्या नशेत असताना आरोपीनी त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याने प्रतिकार केला असता दोघांनी त्याला बांबूच्या (Pune Crime) काठीने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी महादेवकडे असलेले 1,500 रुपये घेऊन पळ काढला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या विधानाचा फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.