Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या विधानाचा फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार

एमपीसी न्यूज : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळावरील केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. (Devendra Fadnavis) संजय राऊत यांच्या वक्तव्याचा सत्ताधारी नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्यावर हक्कभंगाचा खटला ही दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

‘कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये. आम्हीच नाही तर विधीमंडळाचे सदस्य उद्धव ठाकरेही चोर आहेत का, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राऊतांचे विधान मी ही ऐकले. जर ते चोर विधीमंडळ म्हणत असेल तर आम्ही या विधीमंडळत का बोलावं. हे योग्य नाही. इतके नेते या विधीमंडळाने पाहिले आहेत. देशातील सर्वात उत्तम विधीमंडळ म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं’,

Sangavi News : सांगवीत रविवारी मेष राशीतील गुरु-राहु युतीचे परिणाम यावर व्याख्यान

जर चोर या विधीमंडळाबाबत बोललं जात असेल तर विधीमंडळाला अर्थ राहणार नाही. मग कुणीही उठेल आणि काहीही बोलेल. म्हणूनच हक्कभंगाची तरतूद आहे. (Devendra Fadnavis) कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये. आम्हीच नाही तर विधीमंडळाचे सदस्य उद्धव ठाकरेही ठरतात. राऊत हे जबाबदार नेते आहेत. ते राज्यसभेचे खासदार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

‘तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. पण आज आपण सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. या विधीमंडळाचा घोर अपमान झालेला आहे. विधीमंडळाचा हा अपमान खपवून घेतला जाणार नाही. मी या वक्तव्याबद्दल नाराजी व निषेध वक्त करतो. पण यावर विधीमंडळ काय कारवाई करते हे जनता बघतेय, असे फडणवीस पुढे म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

कोल्हापुरात पोहोचताच संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. शिंदे गटावर टीका करताना संजय राऊत म्हणाले होते , ‘ ही बनावट शिवसेना आहे. (Devendra Fadnavis) हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. त्यांनी पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली, पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.