Pune : पोलिसांनी रोखला भर रस्त्यातील ‘भाईचा बड्डे’ अन साजरा केला आजींचा वाढदिवस

एमपीसी न्यूज- रात्री अपरात्री भर रस्त्यात तलवारीने केक कापून मित्रांचा वाढदिवस साजरा करण्याचे फॅड सध्या पुणे शहरात पहायला मिळते. यातून हाणामाऱ्या झाल्याच्याही अनेक घटना उघडकीस आला आहेत. परंतु शहरातील दत्तवाडी पोलिसांनी असाच भर रस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना रोखले. त्याचवेळी एका आजींचा वाढदिवस साजरा करून पोलिसांनी सामाजिक बांधिलकी सुदधा जपली.

हेमंत संजय वैराट (वय 22, रा. 54/7 इंदिरा मिनी मार्केट, पर्वतीदर्शन पुणे) याला तलवारीसह ताब्यात घेतले

दत्तवाडी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना पर्वतीदर्शन परिसरात फटाक्यांचा आवाज आला. यावेळी त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली असता असता एका मुलाचा वाढदिवस असून त्याने रस्त्यावर केक कापण्याची योजना केली होती. त्यासाठी त्याचे मित्र जमा झाले होते व त्यांनी केक कापण्यासाठी तलवार आणली होती. त्यांच्या सार्वजनिक वाढदिवस साजरा करण्यामुळे आजूबाजूचे नागरिक त्रस्त झाले होते. मग पोलिसांनी वाढदिवस साजरा करणाऱ्या त्या मुलाला व त्याच्या सर्व मित्रांना अटकाव केल्यानंतर सर्वत्र पळापळ झाली सर्व शांतता निर्माण झाली. वाढदिवस साजरा करणाऱ्या हेमंत वैराट याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान याच वेळी दोन मुले तेथून केक घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी त्यांना बोलावून विचारणा केली असता त्यांच्या आईचा वाढदिवस असल्याचे त्यांना समजले. मग काय पोलीसही या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे व सहायक पोलिस निरीक्षक शंकर सलगर यांनी पुष्पगुच्छ आणि चॉकलेट देऊन शांताबाई धोंडिबा आदमाने (वय ७२ ) यांना घरात जाऊन वाढदिवसानिमित्त भेट दिली. तसेच त्यांच्या कुटुंबियांसोबत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

अशा प्रकारे एक बाजूला नागरिकांना त्रासदायक ठरणारा व पुढे भाईगिरीमध्ये पाउल टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या गुन्हेगाराला वेळेत थांबवले व त्याच वेळेस एका आईचा वाढदिवस साजरा करून आपली सामाजिक बांधिलकी सुदधा जपली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.