Pune : पांडुरंगाच्या दर्शना आधीच वारकऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत पांडुरंगाच्या दर्शनासाठी (Pune) निघालेल्या एका वारकऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावच्या हद्दीत हा अपघात घडला. लक्ष्मण मार्तंड रोडे (वय 75, घुटेवाडी, श्रीगोंदा, अहमदनगर) असे या वारकऱ्याचे नाव आहे.

त्या प्रकरणी अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा येथील दिंडी बुधवारी रात्रीपासून मधून वाडी ग्रामपंचायत हद्दीतील सकुंडे वस्ती जवळ मुक्कामी होते. बुधवारी सकाळी दिंडीतील सदस्य असलेले लक्ष्मण रोडे हे पहाटे प्रात:विधीसाठी रस्ता ओलांडत होते.

यावेळी सोलापूर बाजू कडून पुण्याला जाणाऱ्या एका वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात रोडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला.
दरम्यान भिगवण पोलीस ठाण्यात कल्याण गुलाब घुटे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.