Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारामधील महात्मा गांधीं यांचे वास्तव्य राहिलेल्या वास्तूचे पुनर्निर्माण करा – काँग्रेस

एमपीसी न्यूज- गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारामध्ये महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या वास्तूचे पुनर्निर्माण आणि जतन, संवर्धन करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे महापालिकेकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रपिता महात्म्हा गांधी यांची 150 वी जयंती नुकतीच देशभरात साजरी केली गेली. या निमित्ताने पुणे शहरात सुद्धा अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. पुणे शहरात गांधींचींच्या आठवणीचा अपार ठेवा आहे. त्यातील एक म्हणजे गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच ना.गोपाळ कृष्ण गोखले यांचे वास्तव्य असणाऱ्या वास्तू आहेत. पुणे महापालिकेने या वास्तू हेरीटेज ( पुरातत्व वारसा ) म्हणून जाहीर कलेल्या आहेत.

या वास्तूंपैकी गोपाळ कृष्ण गोखले यांचे वास्तव्य असलेल्या वास्तूचे पुणे महानगरपालिके कडून गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मृती शताब्दी निमित्त पुनर्निर्माण करण्यात आले होते. या वास्तू शेजारीच महात्मा गांधी यांनी वास्तव्य केलेली वास्तू असून ही देखील हेरीटेज म्हणून महापालिकेने जाहीर केली आहे. तरी गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने या वास्तूचे पुनर्निर्माण आणि जतन करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.