Pune: फडणवीसांनी गडकरींच्या सल्ल्याचे तरी पालन करावे, गृहमंत्र्यांचा टोला

Pune: Devendra Fadnavis should follow Nitin Gadkari's advice, Home Minister anil deshmukh slams फडणवीस हे भाजपमध्ये नेत्यांच्या आदेशांचे पालन करण्याची परंपरा असल्याचे वारंवार सांगत असतात. आता त्यांनीच त्यांच्याच नेत्यांचा सल्ला ऐकावा

एमपीसी न्यूज- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना टोला लगावला आहे. भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कोरोनाच्या संकटकाळात कोणीही, कुठलेही राजकारण करु नका, सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला आहे. परंतु, त्यांच्याच पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तो सल्ला मानावा, अशी खोचक प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.

अनिल देशमुख हे विविध बैठकांसाठी रविवारी (दि.8) पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपकडून केल्या जात असलेल्या राजकारणावर भाष्य केले.

फडणवीस हे भाजपमध्ये नेत्यांच्या आदेशांचे पालन करण्याची परंपरा असल्याचे वारंवार सांगत असतात. आता त्यांनीच त्यांच्याच नेत्यांचा सल्ला ऐकावा, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.

तत्पूर्वी, कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सोयी – सुविधांबद्दल पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे देशमुख यांनी कौतुक केले. यावेळी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “लोक भावनांचे सर्वेक्षण” या पुस्तिकेचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.