Talegaon Dabhade: तळेगाव येथील शिबिरात 87 जणांचे रक्तदान

Talegaon Dabhade: Blood donation of 87 people in the camp at Talegaon यावेळी रक्तदात्यांना मंडळातर्फे सर्व रक्तदात्यांना मास्क, रोग प्रतिकारशक्तीच्या गोळ्या तसेच रक्तदान केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

एमपीसी न्यूज- तळेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर, न्यू आनंद नगर येथे रविवारी (दि.7) पार पडलेल्या रक्तदान शिबिरात 87 जणांनी रक्तदान केले.

यावेळी रक्तदात्यांना मंडळातर्फे सर्व रक्तदात्यांना मास्क, रोग प्रतिकारशक्तीच्या गोळ्या तसेच रक्तदान केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी बापूसाहेब भेगडे युवा मंच, श्री गजानन महाराज सेवा मंडळ, तुकाराम नगर मित्र मंडळ, न्यू आनंद नगर, वनराई मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ, शौर्य गृप, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आदींनी परिश्रम घेतले.

अमित भेगडे, ऋषीकेश भेगडे, राहुल कुलकर्णी, नितीन खळदे, निलेश गराडे, तुषार भेगडे, बिरजू किल्लावाला, किरण कासुळे, अभिजीत काकडे, अमेय मालपाठक , भास्कर माळी, प्रशांत तावरे, प्रशांत ठोके, पल्लवी भेगडे, वैशाली खळदे, ज्योती शिंदे, मनीषा बांदल, राजश्री चोरघे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

तळेगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, नगरसेवक अरुण माने, सुर्यकांत काळोखे, अयुब शिकीलकर, गोपाळ परदेशी, विशाल वाळुंज, माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्रशेठ खळदे तसेच तळेगाव पोलीस ठाण्याचे एपीआय दुर्गनाथ साळी व दिगंबर आत्तीक्रे यांनी भेट दिली.

तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी तळेगाव नगरपरिषदेचे गटनेते किशोर भेगडे यांनी २५ व्या वेळी रक्तदान केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.