Pune : कोरोनाच्या 117 रुग्णांना डिस्चार्ज, 460 नवे रुग्ण; 12 जणांचा मृत्यू

Discharge to 117 patients of corona, 460 new patients; 12 killed

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 117 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज, बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 10 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. दिवसभरात तब्बल 460 नवीन रुग्ण आढळले.

सध्या पुणे शहरात 232 क्रिटिकल रुग्ण असून, 44 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 481 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 3 हजार 449 आहे.

आजपर्यंत 6 हजार 713 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या आज 2 हजार 841 चाचण्या घेण्यात आल्या. त्यात 460 नवीन रुग्ण आढळले.

पुणे शहरात कोरोनाचे आता 10 हजार 643 रुग्ण झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

हडपसरमधील 78 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, वडारवाडीतील 59 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, बोपोडीतील 56 वर्षीय पुरुषाचा डी. एच. औंध हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तर कसबा पेठेतील 76 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 63 वर्षीय, कोंढाव्यातील 57 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, दांडेकर पूल परिसरातील 86 वर्षीय महिलेचा पुना हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तसेच जुनी वडारवाडीतील 40 वर्षीय, हडपसरमधील 68 वर्षीय आणि पांडवनगरमधील 48 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढाव्यातील 57 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 86 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, धुळे जिल्ह्यातील 81 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, लोणावळ्यातील 50 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.