Pune : टांगेवाला कॉलनीमधील 5 मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वाटप

एमपीसी न्यूज – पुणे येथे बुधवारी (दि. 25/09/2019 रोजी) अतिवृष्टीमुळे टांगेवाला कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या कॉलनीतील  7 मयतांपैकी 5 लोकांच्या कुटुंबियांना उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आणि तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. उर्वरित दोन कुटुंबीय कोल्हापूर येथे असल्याने धनादेश तयार करून ठेवले आहेत.

टांगेवाला ही कॉलनी पानशेत पूरग्रस्तांची आहे. गेल्या वीस वर्षापासून तिथे शेकडो कुटुंबे राहत आहेत. ढगफुटीमुळे या वस्तीमध्ये आंबील ओढ्याचे पाणी शिरले. 5 जण वाहून गेले. यात 1 महिला व 2 बालकांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.