Pune : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त अन्नधान्य, पीपीई किट वाटप

Distribution of food grains, PPE kits on the occasion of Shiv Sena anniversary

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षाच्या 54  व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे गटनेते व नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्यातर्फे कोथरूड परिसरातील रिक्षाचालक बांधवांना अन्नधान्य किट, तर पुणे जिल्हा अँम्ब्युलन्स असोसिएशनच्या चालक व सहाय्यकांना पीपीई किट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी असोसिएशनच्या वतीने सचिव गोपाळ जांभे, अंकुश जुळवणी, सुशोत गोडसे, परमेश्वर त्रिभुवन, सदाशिव पुरी, एकनाथ काष्टे, हेमंत धावडे, निवृत्ती वाघ उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मराज सुतार, सुधीर वारघडे, भूषण माथवड, अनिल भगत, शरद डहाळे, योगेश क्षीरसागर, दत्ता गोयेकर, जितेंद्र खुंटे यांनी सहकार्य केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार महिन्यांपासून शिवसेनेतर्फे कोथरूड परिसरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गरजू लोकांना अन्नधान्य वाटप हा कार्यक्रम सातत्याने सुरू आहे.

प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना ‘अर्सेनिक अल्बम – 30 गोळ्या व मास्क वाटप तसेच, सोसायट्यांना सॅनिटायजर स्टँडचेही वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती पृथ्वीराज सुतार यांनी दिली.

श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे रोज 100 गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास 3 हजार नागरिकांना ही मदत पोहोचविण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात कोथरूडकारांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.