Pune District Football Association : सासवड एफसीचे जुन्नरविरुद्ध आठ गोल

एमपीसी न्यूज –  लायन्स आणि पुणे पायोनिर्स यांच्यातील १६ वर्षांखालील गटातील साखळी लढत ४ – ४ अशी बरोबरीत सुटली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या लीग स्पर्धेत द्वितीय श्रेणीत सासवड एफसी संघाने जु्न्नर तालुका संघावर ८-१ असा विजय मिळविला.

 

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सी गटातील सामन्यात अथर्व खडतरेच्या (३०, ३५, ३९वे मिनिट) हॅटट्रिकच्या जोरावर पुणे पायोनिरने ११ खेळाडूंसह खेळताना ४ लायन्सला ४ – ४ असे बरोबरीत रोखले. ४ लायन्सकडून अजय बंजात्री (१६वे, ३८वे मिनिट) आणि परिक्षीत गव्हाणकर (३९ वे मिनिट), निपुणे बांगड (६० वे मिनिट) यांनी गोल केले. पुणे पायोनिर्सचा एकगोल विघ्नेश कदमने २६व्या मिनिटासला केला.

तृतिय श्रेणीतील एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात सासवड एफसी संघाने ई गटातील सामन्यात जुन्नर तालुका संघावर ८-१ असा विजय मिळविला. संमित्रा मिसाळने २२, ४० आणि ४७व्या मिनिटाला तीन गोल केले. त्याला मिहिर पवारने २१, ५९वे, प्रणव झेंडे २७वे, शोएब शेख ३१वे आणि माधन महामुनी ६२वे मिनिट यांनी गोल करून सुरेख साथ दिली. या सगळ्यांच्या प्रयत्नांनी सासवडचे गोलाधिक्य वाढू शकले. जुन्नरसाठी एकमात्र गोल प्रसाद कबाडी याने सातव्या मिनिटला केला.

स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या ड गटातील सामन्यात खडकी ब्ल्यूज संघाने सुखाई एफसीचा ३-२ असा पराभव केला. सलमान सलमानी याने ५१वे, गगन बोगर १७नवे मिनिट, साहिल काकडे २२वे मिनिट यांनी गोल केले. पराभूत संघाच्या सुखाईकडून अमोल वाघमारे (३८वे) आणि यश अगरवाल (४३वे मिनिट) यांनाच गोल करता आले.

निकाल –

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल –
१६ वर्षांखालील गट अ – गेम ऑफ गोल (जीओजी) एफसीसी १५ (रणवीर बैसे ३रे, वरद विनोद  ४थे, १७वे, २३वे, सोहन चांदपोरे ६नवे, १४वे, ३०+१ले, ५४वे, आर्यन सुब्रमण्यम २१वने, अपूर्वा आर. २७वे, मचार दरेकर ३४वे, ३६वे, ५८वे, शौर्य शेवाळे ४५, ५१वे मिनिट) वि.वि. भोर एफसी ०

गट सी – मॅथ्यू एफए ६ (अर्जुन तावरे १९वे, आदित्य धुमाळ २१वे, सागर जगताप २४वे, नीरव पिल्ले २६वे,. ध्रुव शर्मा ३७वे, श्लोक चौधरी, ३८वे मिनिट) वि.वि. ब्लॅक हॉकर्स १ (अथर्व कुडले २३वे मिनिट),
४ लायन्स ४ (अजय बजांत्री १६, ३८वे मिनिट, परिक्षीत गव्हाणकर ३९वे, निपुण बांगड ६०वे मिनिट) बरोबरी वि. पुणे पायोनिर्स ४ (विघ्नेश कदम २६वे, अथर्व खडतरे ३०, ३५ आणि ३९वे मिनिट)

स.प. महाविद्यालय
द्वितीय श्रेणी – अ गट – दिएगो ज्युनिअर्स १ (अगता पाटणकर २५वे मिनिट) बरोबरी वि. सनी डायस १ (सोहेल शेख ७०वे मिनिट)
उपसा ० अनिर्णित वि. व्हॅली हंटर्स ०

गट ड – खडकी ब्ल्यूज ३ (गगन बोगर १७वे, साहिल काकडे २२वे, सलमान सलामणी ५१ वे मिनिट) वि.वि. सुखाई एफसी २ (अमोल वाघमारे ३८वे, यष अगरवाल ४३वे मिनिट)

एसएसपीएमस मैदान – तृतिय श्रेणी

गट सी – बेटा अ १ (आशुतोष धनवाद ५७वे मिनिट) वि.वि. लिजेंडस युनायटेड ०
गट डी – लिजेंड्स एफए १ (ऑस्टिन मॅथ्यू २७वे मिनिट) वि.वि. पिंपरी चिंचवड ०
गट ई – सासवड एफसी ८ (मिहीर पवार २१वे, ५९वे, सन्मित्र मिसळ २२वे, ४०वे, ४७वे, प्रणव झेंडे २७वे, शोएब शेख ३१वने, माधव महामुनी ६०+2 रे मिनिट) वि.वि. जुन्नर तालुका १ (प्रसाद काबडी २१वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.