Farmer suicide : नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत जुन्नरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज : जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फायनान्स वाले पतसंस्थे वाले दमदाटी करतात अपशब्द वापरतात अशा आशयाची चिठ्ठी लिहून या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर आत्महत्या केली.(Farmer suicide) जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद परिसरात ही घटना घडली. आळेफाटा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दशरथ लक्ष्मण केदारी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दशरथ केदारी हे अल्पभूधारक शेतकरी होते.(Farmer suicide) कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांनी शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.

Shivshahi bus accident : सासवडजवळ कंटेनर आणि शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

यामध्ये त्यांनी पतसंस्थेवाले अपशब्द वापरतात फायनान्स वाले दमदाटी करतात. त्यात शेतीमालाला बाजार भाव मिळत नाही. याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे.(Farmer suicide) मोदींचा शेतीवर कंट्रोल नाही. त्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं दशरथ केदारी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळून आले आहे. पत्राच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.