Pune : दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर (Pune) जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र आणि भामा आसखेड जलकेंद्रात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (दि.21) करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी (दि.22) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे:

मध्यवर्ती भागातील सर्व पेठा, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर 1 आणि 2 , लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक (Pune) परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, रेसकोर्स, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, लोहगाव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, गुरूगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर.

Nagpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण

शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लम्हाण तांडा, सूस रस्ता, रेणूका नगर, पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळ नगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य महाविद्यालय परिसर, धनंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम काॅलनी, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, कालवा रस्ता, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, वकीलनगर, करिष्मा सोसायटी, शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदानगर, जयभवानीनगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी, हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव, येवलेवाडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.