Pimpri : चैन स्नॅचींग करणाऱ्या तीन सराईतांना व चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या दोन सोनारांना बेड्या, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने( Pimpri)कारवाई करत चैन स्नॅचींग व दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. तसेच चोरीचे सोने खरेदी कऱणाऱ्या दोन सोनारांना देखील अटक कऱण्यात आली आहे.

यामध्ये पोलिसांनी 16 लाख रुपयांचा ऐदव जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर असलेल्या 14 गुन्ह्यांची उकल देखली झाली आहे.

आनंद सुनिल साळुंखे उर्फ लोहार (वय 19. रा.खडकी), अक्षय अशोक मुकुटे (वय 31 रा.धानोरी) धिरज गोपाळ गवळी (वय 31 रा. खडकी) तसेच ज्वेलर्स गणपत जवाहरलाल शर्मा (वय 44), दर्शन रमेश पारिख (वय 32 रा. खडकी) अशी अटक आरोपींचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथे 5 डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी आरोपींनी हिसकावली होती. या घटनेनंतर काही वेळातच कासारवाडी येथेही सोन्याचे मंगळसुत्र हिसकावल्याचे उघड झाले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या तपासी पथकाने सीसीटीव्ही द्वारे आरोपींची लख पटवून आनंद लोहार याला खडकी येथून ताब्यात घेतले.

यावेळी त्याने त्याचा साथीदार महादेव उर्फ महाद्या उर्फ अजय गौतम थोरात याच्या साथीने महाळुंगे पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी करत होता हे कबुल केले. तसेच त्याने सोनसाखली चोरीत सामील असलेल्या इतर आरोपींबद्द्ल सांगितले अशता पोलिसांनी इतर चार आरोपींनाही ताब्यात घेतले. हे चोरीचे सोने आरोपींनी दर्शन पारिख व गणपत शर्मा या ज्वेलर्सला विक्री केल्याचे कबुल केले.

Nagpur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण

या तापासात पोलिसांनी 255 ग्रॅम वजनाचे सोने व दुचाकी असा एकूण 16 लाख 30 हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. या कारवाईतच पोलिसांनी एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. ज्यामध्ये सांगवी पोलीस ठाण्यातील तीन, भोसरी पोलीस ठाण्यातील 3, हिंजवडी , चिखली, कोरेगाव, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा, म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनीट चारचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उफनिरीक्षक गणेश रायकर, आबासाहेब किरनाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, आदिनाथ मिसाळ, पोलीस हवालदार प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाय, रोहीदास आडे, पोलीस नाईक वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, पोलीस शिपाई प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.