Pune : पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश देणार्‍या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- ‘माय अर्थ फाऊंडेशन’, ‘सिंहगड युवा फाऊंडेशन’आणि ‘शिवोदय मित्र मंडळ’ यांच्या संयुक्तविद्यमाने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी आज, रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मित्रमंडळ चौकातील पर्यावरण शिल्प येथून पर्यावरणप्रेमी नागरिक नितीन कदम यांच्या हस्ते या रॅलीला प्रारंभ झाला. श्री गणेश वेशात पर्यावरण संदेश देणाऱ्या युवकाने रॅलीचे नेतृत्व केले. प्लास्टिक व थर्माकोलमुक्त गणेशोत्सव, पर्यावरण रक्षण, नदी-ओढे -नाले संरक्षण, निर्माल्यमुक्त, प्रदूषणमुक्त असा गणेशोत्सव साजरा करू असे संदेश रॅलीमध्ये देण्यात आले. अनंत घरत (अध्यक्ष, ‘माय अर्थ फाऊंडेशन’) , दिनेश भिलारे ,मनीष जगदाळे तसेच सुमारे शंभर युवक या सायकल रॅलीत सहभागी झाले .

सारसबाग, विजयानगर, अलका टॉकीज मार्गे शनिवारवाड्यास फेरी मारून कसबा गणपती येथे रॅलीची सांगता झाली .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.