Pune FDA action : मंचर येथे अस्वच्छ परिसरात साठवलेला 119 किलो खवा व 28 किलो गुजरात बर्फी जप्त

एमपीसी न्यूज : मंचर येथे अस्वच्छ परिसरात साठवलेला 119 किलो खवा व 28 किलो गुजरात बर्फी जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालय यांनी सांगितले आहे.(Pune FDA action) त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महावीर डेअरी अँड स्वीट मार्ट, मंचर या ठिकाणी 3 सप्टेंबरला धाड टाकण्यात आली होती .या धाडीत त्यांना अस्वच्छ परिसरात साठवलेला 119 किलो खवा व 28 किलो गुजरात बर्फी आढळून आली. ती अन्न व औषध प्रशासन पुणे यानी जप्त केली आहे.

मंचर येथील महावीर डेअरी अँड स्वीट मार्ट, या ठिकाणी 3 सप्टेंबरला धाड टाकण्यात आली होती . तेथे त्यांना अस्वच्छ परिसरात साठवलेला 119 किलो खवा व 28 किलो गुजरात बर्फी(राधे) आढळून आली. ती त्यांनी जप्त केली आहे. त्यानुसार नि.ब. खोसे, अन्नसुरक्षा अधिकारी यांनी त्या ठिकाणाहून खवा व गुजरात बर्फीचे दोन नमुने घेऊन उर्वरित खवा 119 किलो किंमत रुपये 23,800 व स्वीट खवा (गुजरात बर्फी) 28 किलो किंमत रुपये 5,600 असा एकूण रुपये 29 हजार 400 चा माल जप्त केला आहे.

सदर स्वीट खवा (गुजरात बर्फी) ही साखर, दूध पावडर, खाद्यतेल व इतर घटक पदार्थांपासून बनविलेले असल्याचे लेबल वरून स्पष्ट होते.(Pune FDA action) दुकानदाराने सांगितले की, तो हा स्वीट खवा (गुजरात बर्फी ) मिठाई विक्रेत्यांना विक्री करत असून. त्यापासून मिठाई विक्रेते वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बनवून विकत असतात.

Chadrashekhar Bawankule : भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मंगळवारी बारामती दौऱ्यावर

तीन सप्टेंबरला येथील दोन प्रमुख मिठाई विक्रेत्यांच्या दुकानात तपासणी केली असता त्या ठिकाणी मिठाई ट्रे वरती बेस्ट बिफोर दिनांक नमूद केले नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई करण्यात आली.(Pune FDA action) ही कारवाई संजय नारागुडे, सह आयुक्त (अन्न) पुणे यांच्या उपस्थितीत सु.स क्षीरसागर सहाय्यक आयुक्त (अन्न) व नि.बा खोसे, अन्नसुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.

 

पुणे जिल्ह्यातील सर्व मिठाई विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाच्या(Pune FDA action) वतीने आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांचे दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती बेस्ट बिफोर दिनांक नमूद करावी व मिठाई बनविण्यासाठी वरील प्रकारच्या स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर न करता दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खवा गुजरात बर्फी चा वापर करून मिठाई बनवित असल्याचे आढळल्यास संबंधितां विरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल असा इशारा संजय नारागुडे, सह आयुक्त (अन्न ) पुणे यांनी दिला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.