Pune Fire : पुण्यातील कासट साडी सेंटरला आग; कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज : पुण्यातील कर्वे रस्त्यावरील कासट साडी सेंटर असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना गुरुवारी घडली.(Pune Fire) अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आ‌णली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अवघ्या काही वेळेतच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

Eknath Shinde : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

कर्वे रस्त्यावर कासट साडी सेंटर हे दुकान आहे. हे दुकान असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात अचानक आग लागली. सकाळी कार्यालयात जाणाऱ्यांची तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची या रस्त्यावर लगबग असते. साडेअकराच्या सुमारास ही आग लागल्याचे निदर्शनास आले.(Pune News) त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणाही जखमी झाले नाही. मात्र काही वेळातच आग आटोक्यात आल्याने साडी सेंटरचे काही प्रमाणातच नुकसान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.