Pune : जुन्या वादातून सलग चौथ्या दिवशी पुण्यात गोळीबार

एमपीसी न्यूज – पुण्यात तीन दिवसांत गोळीबाराच्या चार घटना (  Pune) घडल्या आहेत. आता शुक्रवारी पुन्हा गोळीबार झाला आहे. जुन्या वादातून पुणे शहरातील येरवडा परिसरात गोळीबार झाला आहे.आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर ही घटना घडली. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते.

PCMC School : महापालिका शाळांमधील समस्यांचे निराकरण करा; अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या सूचना

तत्पूर्वी बुधवारी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एका बांधकाम व्यवसायिकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी दिसून नादुरुस्त झाल्याने हा तरुण बचावला. तर हडपसर पोलीस स्टेशनच्या हाती शेवाळवाडी परिसरात व्यावसायिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली.

एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या ( Pune ) झाडल्या. तसेच काल गुरुवार ( दि.19)  पहाटे अडीच वाजताच्या सुमारास सिंहगड रोडवरील भुमकर चौकात गणेश गायकवाड आणि अन्य काही लोकांची काडीपेटी मागण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यावरून अनोळखी व्यक्तींनी गणेश गायकवाड यांच्यावर (  Pune) गोळीबार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.