_MPC_DIR_MPU_III

Pune : माजी नगरसेवक सनी निम्हण यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

माजी आमदार विनायक निम्हण यांच्या भूमिकेकडे लक्ष

भाजपला शिवाजीनगर, कोथरुड मतदारसंघात होणार फायदा

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक, शिवसेना उपशहरप्रमुख सनी निम्हण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. शिवाजीनगर आणि कोथरुड मतदारसंघात येत असलेल्या औंध, बालेवाडी, बाणेर, पाषाण या भागात निम्हण यांचे वर्चस्व असून भाजपचे कोथरुडचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगरचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, सनी यांचे पिताश्री माजी आमदार विनायक निम्हण आता कोणती भूमिका घेतात याकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज (मंगळवारी) हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने निम्हण यांचा भाजप प्रवेश झाला आहे.

सनी निम्हण हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. 2012 मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर ते निवडून आले होते. त्यांनी औंध-पाषाण भागाचे महापालिकेत नेतृत्व केले आहे. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणूनही सनी निवडून आले होते. त्यांचे शिवाजीनगर आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघात मोठे काम आहे. तरुण कार्यकर्त्यांचे त्यांचे मोठे जाळे आहे. शिवाजीनगर आणि कोथरुड मतदारसंघात येत असलेल्या औंध, बालेवाडी, बाणेर, पाषाण या भागात निम्हण यांचे वर्चस्व आहे. निम्हण यांच्या भाजप प्रवेशाने कोथरुड मतदारसंघातील भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांची ताकद वाढली आहे. त्यांना निवडणुकीत मोठा फायदा होईल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सनी यांनी नगरसेवक असताना पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडीतील सोमेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार केला आहे. उद्यान विकसित केले. सनी स्पोट््र्स कॉमप्लेक्स, केएमज हॉस्पीटल, सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, पंडीत भीमसेन जोशी नाट्यगृह उभारणीत पुढाकार घेऊन काम पुर्ण केले. सोमेश्वरवाडीत मुलीसांठी आठवीपर्यंत शाळा सुरु केली.

माजी आमदार विनायक निम्हण यांच्या भूमिकेकडे लक्ष 

सनी हे शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे सुपुत्र आहेत. सनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता विनायक निम्हण यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निम्हण काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विनायक निम्हण यांनी तीनवेळा विधीमंडळात शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुखपद देखील भूषवले आहे. त्यामुळे निम्हण भाजपमध्ये जातात की शिवसेनेतच राहतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

‘यांनी’ केला भाजपमध्ये प्रवेश

सनी विनायक निम्हण (माजी नगरसेवक, शिवसेना उपशहर प्रमुख )विनोद ओरसे ( माजी नगरसेवक ) अमित मुरकुटे ( माजी सदस्य शिक्षण मंडळ पुणे, शिवसेना विभागप्रमुख), राहुल शिरोळे ( शिवसेना विभागप्रमुख ) अनिकेत कपोते ( अध्यक्ष युवासेना शिवाजीनगर )प्राजक्ता गायकवाड ( क्षेत्र संघटिक शिवाजीनगर)पौर्णिमा बहिरट (शिवसेना महिला आघाडी विभागप्रमुख )वनमाला कांबळे (शिवसेना महिला आघाडी विभागप्रमुख )सोनिया मुंडे ( प्रभागप्रमुख महिला आघाडी )प्रवीण जेधे ( उपविभाग प्रमुख औंध)रमेश जुनवणे ( उपविभाग प्रमुख कस्तुरबा इंदिरा )हेमंत डबी ( उपविभाग प्रमुख मॉडेल कॉलनी )टिंकू दास ( उपविभाग प्रमुख मुलारोड )हेमंत कांबळे ( खडकी )अभिषेक परदेशी ( शिवाजीनगर )मायकल स्वामी (खडकी ), संजय निम्हण (पाषाण)

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.