Pune : चाले गावात फटाक्यांमुळे आग लागून चार वाहने जळाली

एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील पौड रोड वरील चाले गावात फटाक्यांमुळे लागली मोठी आग लागून यात चार वाहने जळाली. हि घटना आज दोनच्या सुमारास घडली. यात प्रसंगावधान राखून एका लहान मुलीला वाचविण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, मुळशी तालुक्यातील पौड रोड वरील चाले येथे सुभद्रा मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना लावलेल्या फटाक्यांमुळे स्काॅर्पिओ, बॅलेनो या चारचाकीसह दोन दुचाकी जळून खाक झाल्या.

आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी बॅलेनो गाडीत लहान मुलगी झोपली होती. तिला वेळेत बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.