Wakad : घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली बुलेट अज्ञात चोरट्यांनी बुलेटचे लॉक तोडून चोरून नेली. ही घटना दोन मार्च रोजी सकाळी वाकड येथे उघडकीस आली.

सचिन शंकर विटकर (वय 36, रा.सदगुरु कॉलनी, दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांचा भाऊ शाम याने त्यांची 74 हजार रुपये किमतीची बुलेट (एम एच 14 / एच ई 4529) एक मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर लॉक करून पार्क केली.

रात्री साडेबाराच्या सुमारास सचिन यांना झोपेतून जाग आल्याने त्यांनी घराबाहेर चक्कर मारली असता बुलेट पार्क केलेली दिसली. मात्र, सकाळी बुलेट चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र, बुलेट सापडली नसल्याचे शनिवारी (दि. ७) तक्रार दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.