Wakad : जबरदस्तीने मोबाईल हिसकावणा-या दोन सराईत चोरट्यांना बेड्या; 27 मोबाईल जप्त

गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून येऊन नागरिकांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणा-या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि 27 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

शुभम शिवाजी कदम (वय 19, रा. रुपीनगर, तळवडे), आनंद अर्जुन डोळस (वय 19, रा. रुपीनगर, तळवडे) अशी अटक केलेल्या सराईत मोबाईल चोरट्यांनी नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार शावरसिद्ध पांढरे, पोलीस शिपाई तुषार काळे यांना माहिती मिळाली की, एका पल्सार दुचाकीवर दोघेजण धनगरबाबा मंदिराजवळ आले आहेत. त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल फोन आहेत. त्यानुसार, पोलिसांनी धनगरबाबा मंदिर परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरीचे तब्बल 27 मोबाईल फोन सापडले. दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 11 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर निगडी, पिंपरी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, चिंचवड, चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे वाकड, भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. अन्य 22 मोबाईल फोनबाबत पोलीस तपास करीत आहेत. ज्या नागरिकांचे पिंपरी-चिंचवड परिसरातून मोबाईल फोन हिसकावले गेले आहेत, त्या नागरिकांनी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हि कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस कर्मचारी वासुदेव मुंडे, आदिनाथ मिसाळ, संजय गवारे, प्रवीण दळे, नारायण जाधव, शावरसिद्ध पांढरे, तुषार काळे, प्रशांत सैद, लक्ष्मण आढारी, मोहम्मद नदाफ, तुषार शेटे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, गोविंद चव्हाण, अजिनाथ ओंबासे, सुखदेव गावंडे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.