Pune Crime: बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत उकळले 67 लाख

एमपीसी न्यूज: पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हनी ट्रॅपचं एक प्रकरण उघडकीस आणलय. याप्रकरणी एका तरुणीसह अन्य तिंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime) तर यातील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या तरुणीने आणि तिच्या मित्राने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल 67 लाख रुपये उकळे. जानेवारी 2020 पासून हा प्रकार सुरू होता.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी चेतन रवींद्र हिंगमिरे (रा. काळेपडळ, हडपसर), निखिल उर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (वय 27, गाडीतळ हडपसर) तर एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. वरील दोन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली असून कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी आणि आरोपी तरुणीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीतूनच दोघांमध्ये शरीर संबंध आले. दरम्यान या सर्व प्रकारानंतर आरोपी तरुणीने आपल्या इतर दोन साथीदारांसोबत मिळून फिर्यादीला ब्लॅकमेल केले.अल्पवयीन असतानाही बलात्कार केला, यातून गर्भधारणा झाली आहे असे सांगून पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली. (Pune Crime) प्रकरण मिटवायचे असतील तर पैसे द्यावे लागतील असे सांगून फिर्यादी कडून तब्बल 67 लाख 5 हजार 573 रुपये घेतले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी खातरजमा करून गुन्हा दाखल केला असेल अधिक तपास सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.