Shirur News : नदीच्या बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – नदीच्या बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणारी टोळीला शिरूर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले आहे. या टोळीतील आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
विनोद उर्फ मल्ल्या मरगुत्ती व महेश बिराजदार (दोघे रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), रोहन बिराजदार, (वय 20, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी, मूळ रा.वाणी हंदराळ, ता. उमरगा,कर्नाटक), आदित्य उर्फ अण्णा रायजे, (वय 20, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी, मूळ रा. कोराळी ग्रामपंचायत जवळ, जि. लातूर), आकाश बिराजदार, (वय 23, रा. रा. गव्हाणे वस्ती, भोसरी, मूळ रा. कोराळी, ग्रामपंचायत जवळ, जि. लातूर), प्रशांत मळेकर उर्फ बिराजदार, (रा. वैदवाडी, हडपसर, मूळ रा. रा. गव्हाणे वस्ती, भोसरी, मूळ रा. कोराळी ग्रामपंचायत जवळ जि. लातूर), सुनिल जाधव (वय 19 रा. गव्हाणे वस्ती, भोसरी, मूळ रा.वाणी हंदराळ, पो कुन्हाळी, ता. उमरगा, जि. धाराशिव), समीर सरोदे, (निगडी मूळ रा. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना अटक जरण्यात आली आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बांधाऱ्याचे लोखंडी ढापे 3 लाख 55 हजार 320 रुपये किमतीचे चोरीस गेले होते.
नदीच्या बांधाऱ्यांच्या लोखंडी ढापे चोरण्याचे गुन्हे मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा समांतर तपास करणेबाबत डॉ अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मितेष घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकास दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत, इतर तांत्रिक बाबी व gopni
बातमीदार यांच्याकडे तपास केला. त्यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की विनोद मरगुत्ती व महेश बिराजदार यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केले आहेत.
त्यामुळे दोघांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. हे दोघे त्यांच्या साथीदारांसह लांडेवाडी चौक, भोसरी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्या दोघांना सापळा रचून तेथे पकडले. त्यांच्याकडे इतर साथीदारांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे रोहन बिराजदार व आदित्य रायजे असे सांगितले. त्यामुळे त्या दोघांना पकडून चौकशी केल्यावर सांगितले की, आणखी काही साथीदारांच्या मदतीने गुन्हे केले आहेत व त्यासाठी एका कारचा वापर केला होता. इतर साथीदार हे लांडेवाडी ते भोसरी रोडवरील जायका बिर्याणी हॉटेल जवळ असल्याचे सांगितले.
तेथे संशयितरित्या उभे असलेल्या तरुणांना ताब्यात घेतले.त्यांनी त्यांची नावे आकाश बिराजदार, प्रशांत मळेकर उर्फ बिराजदार, सुनिल जाधव व समीर सरोदे सांगितले. त्यांच्याकडे चोरीचा मालाबाबत विचारल्यावर सांगितले की, आरोपी विनोद मरगुत्ती व आदित्य उर्फ अण्णा रायजे यांनी तो माळ भंगार व्यावसायिक फिरोज शेख, रा. लांडेवाडी, गव्हाणे वस्ती, भोसरी याला तो माल चोरीचा असल्याची जाणीव करून देऊन विक्री केली होती.
सर्व आठ आरोपिंची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकूण 9 गुन्हे उघडकिस आले आहेत. त्यामध्ये शिरूर पोलीस ठाणे मधील 2, खेड पोलीस ठाण्यामधील 4, मंचर पोलीस ठाण्यामधील 2 व पौड पोलीस ठाण्यामधील 1 गुन्हा उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.