Pune: भाजपच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे

एमपीसी न्यूज – भाजपच्या पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची आज (सोमवारी) नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा भाजपच्या चिंचवड येथील मेळाव्यात करण्यात आली.

पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष बाळा भेगडे यांची नुकतीच राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. कामगार, मदत पूनर्वसन राज्यमंत्रीपदी भेगडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार गणेश भेगडे यांची नियुक्ती केली असल्याचे भाजपचे प्रदेश महामंत्री सुरेश हाळवणकर यांनी सांगितले.  जिल्हाध्यक्षपदी असताना बाळा भेगडे यांनी चांगले काम केले आहे, असेही हाळवणकर म्हणाले.

चिंचवड येथील आहेर गार्डन कार्यालयात भाजपा कार्यकर्ता बैठकीत आज महाराष्ट्र प्रदेश भाजपचे महामंत्री हळवणकर यांनी गणेश किसनराव भेगडे यांची निवड जाहीर केली.

  • यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगार, पुनर्वसन राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, आमदार लक्ष्मण जगताप आदीसह पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणेश भेगडे यांचा सत्कार करण्यात आला.

गणेश भेगडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते म्हणून कार्यभार सांभाळला आहे. भेगडे एक अभ्यासू व खर्डे वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. पुणे जिल्हा भाजपच्या प्रभारी पदाची जबाबदारी अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळत असून पै विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे व सह्याद्री इंग्लिश स्कूलचे ते संस्थापक आहेत.

  • राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातही भेगडे यांचा दबदबा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.