Pune : सराईत गुंडाला अटक; दोन पिस्तुलांसह आठ काडतुसे जप्त

gangster arrested; Eight cartridges with two pistols seized

एमपीसीन्यूज : पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील एका सराईत गुंडाला अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि आठ काडतुसे जप्त केली आहेत.

आदिनाथ उर्फ आदित्य सोपान साठे (वय 25), असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. आरोपी साठे हा सराईत गुन्हेगार निलेश वाडकर आणि कुणाल कांबळे याचा साथीदार आहे.

_MPC_DIR_MPU_II

आदित्य साठे हा सिंहगड रस्ता परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांना घेतलेल्या झडतीत त्याच्याजवळ दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे सापडली.

पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याजवळील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.