Pune : पालकमंत्र्यांकडे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी इच्छाशक्ती नाही- अजित पवार

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मी पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले. पण आताच्या पालकमंत्र्यांकडे पुण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी इच्छाशक्ती नाही अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. प्राधिकरणाने पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावर मुख्यमंत्री त्यांच्या विशेष अधिकारात पाण्याचा निर्णय घेऊ शकतात असेही ते म्हणाले.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना. पुण्याच्या पाणी प्रश्ना सह अनेक घटनांवर त्यांनी भूमिका मांडली. पवार म्हणाले की, मागील साडेचार वर्षातील कारभार पाहता सध्याचे राज्यकर्ते पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले असून पालकमंत्र्यांमध्ये इच्छाशक्ती नाही. जेव्हा तहान लागणार तेव्हा विहीर खोदू नका अशा शब्दात पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका केली. पुणेकर नागरिकां साठी योग्य पाण्याचे नियोजन करावे. अशी मागणी देखील त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.