Pune : Good News ! 22 दिवसांची चिमुरडी आणि 80 वर्षीय महिला कोरोनामुक्त

22-day-old child and 80-year-old woman corona-free

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रोज रुग्ण वाढत असताना शुक्रवारी पुणेकरांसाठी एक ‘ गुड न्यूज’ समोर आली आहे. ससूनमध्ये उपचार घेणारी हडपसर येथील 22 दिवसांची चिमुरडी आणि पर्वती येथील 80 वर्षीय महिला या दोघी कोरोनामुक्त झाल्या आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेला मधुमेहचाही त्रास होता. तरीही या संकटावर मात करून त्या कोरोनमुक्त झाल्या. या जेष्ठ महिलेवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे महापौरांनी आभार मानले.

पुणे शहरात कोरोनाचे 11 हजारांच्या वर रुग्ण गेले आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

अशा संकटाच्या काळात 22 दिवसांची चिमुरडी आणि 80 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कोरोना झाला म्हणून घाबरण्याचे काहीही कारण नाही. वेळीच उपचार, काळजी घेतल्याने कोरोना सुद्धा बरा होऊ शकतो, हे अनेक नागरिकांनी दाखवून दिले आहे.

पुणे शहरातील कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, डॉकटर, नर्सेस, महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे.

त्यामुळे पुणेकरांनी या रोगाला न घाबरता त्याचा सामना करण्याची गरज आहे. सध्या कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण वाढत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.